Posts

Showing posts from December, 2020
 आज आहे दोन डिसेंबर. संयुक्त अरब गणराज्य हा देश स्थापन होऊन एकोणपन्नास वष्रे झाली. अबुधाबी ही त्याची राजधानी. अबुधाबीत तुम्ही जेव्हा जेव्हा चक्कर मारता तेव्हा तेव्हा कुठेतरी एखादी बिल्डिंग पाडली तरी जाताना दिसते किंवा बांधकाम तरी होताना दिसते.  अगदी सुरुवातीला ज्या बिल्डिंग बांधल्या गेल्या, त्यावेळी बिल्डिंग कोड किंवा असे कडक नियम वगैरे नव्हते. म्युन्सिपाल्टी पण तयार होत होती आणि काहीच निर्बंध नव्हते. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी वाळू, आतमधले लोखंडाचे बार वगैरे अतिशय कमी दर्जाचे वापरले गेले होते. साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर बिल्डिंग कोड तयार झाले. मग त्यानंतर बांधल्या जाऊ लागलेल्या इमारती या कोडप्रमाणे बांधणे सुरु झाले. मग तेव्हापासून जुन्या ज्या काही बिल्डिंग्ज, होत्या त्या तोडून तिथे नवीन बांधणे जोरात सुरू झाले. जे आजतागायत चालू आहे. म्हणजे थोडक्यात वीस पंचवीस वष्रे जुनी झालेली इमारत तोडून तिथे नवीन इमारत बांधणे अखंड सुरू आहे. मात्र ज्या नव्या इमारती बांधून झाल्या आहेत त्या पुढील किमान साठ वर्षांसाठी आहेत. आत्ता सत्तावीस नोव्हेंबरला एक अजबच प्रकार घडला. अबुधाबीच्या बंदर...