Posts

Showing posts from November, 2022
Image
  बारा गांवचे पाणी - भाग दुसरा   २००५ - २००६ मधील मासिक बहर मधे " बारा गांवचे पाणी " ही मालिका प्रकाशित झाली होती . ती आता नव्या रूपात पुनःप्रकाशित होत आहे . आपले अभिप्राय कळवावे . -       नरेन्द्र कुलकर्णी बारा गांवचे पाणी - गांव दुसरे – रामटेक या सदरातील पुढचे गावं रामटेक. हेही पैठण सारखेच अति प्राचीन. नागपूरपासून ४२ कि.मी. वर. सातपुड्याची सुंदर पर्वतरांग आणि त्यातील एक नयनमनोहर टेकडी म्हणजे रामटेक. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणासहित चित्रकूटाहून पंचवटीकडे जाताना इथे काही काळ राहिले (टेकले) म्हणून या जागेचे नांव - रामटेक. कदाचित रामटेकडी या नावाचे पुढे रामटेक नाव झाले असेल. या टेकडीच्या सुमारे ५०० पायऱ्या चढताना असंख्य रामसेनेला (वानरांना) तोंड द्यावे लागते. अगदी माथ्यावरसुद्धा. त्यामुळे जपूनच राहावे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यात अगस्ती ऋषींनी इथे दर्शनाला येऊन एक यज्ञ केला. त्या यज्ञाची पेटती धुनी आजही तिथे पाहायला मिळते. टेकडीवर रामाचे देऊळ आहेच. याशिवाय लक्ष्मणाचे वेगळे मंदिर आहे. भारतीय पुरातत्व खात्य...