Posts

Showing posts from October, 2022
Image
बारा गांवचे पाणी - भाग पहिला   २००५ - २००६ मधील अबुधाबी महाराष्ट्र मंडळाच्या  मासिक बहर मधे " बारा गांवचे पाणी " ही मालिका प्रकाशित झाली होती . ती आता नव्या रूपात पुनःप्रकाशित होत आहे . आपले अभिप्राय कळवावे . -       नरेन्द्र कुलकर्णी बारा गांवचे पाणी - गांव पहिले - पैठण औरंगाबादपासून ४८ कि . मी . वर वसलेले अतिप्राचीन गांव - पैठण . ' प्रतिष्ठान’ या नांवाने असंख्य दस्तऐवजात याचा लक्षणीय उल्लेख आढळतो . नक्कीच ३००० वर्षांहून जास्त जुने शहर . या गावाने अफाट वैभव अनुभवले . शतकानुशतके मोठी होत गेलेली राजघराणी व त्यांचा राज्यविस्तार बघितला . अनेक शूरांचे गोडवे गायले आणि त्याचबरोबर उतरती कळाही पाहिली. वाल्मिकी रामायणात उल्लेखल्याप्रमाणे वैवस्वत मनुचा मुलगा ईला याने प्रतिष्ठानची स्थापना केली . व त्याचा मुलगा पुरुरवा याने राज्याचा विस्तार केला . पुढे सातवाहनांनी प्रतिष्ठान ही राजधानी केली . आणि भरभराट केली . या काळात हे वेदपठणाचे केंद्र बनले , आणि दक...