Posts

Showing posts from January, 2023
Image
  बारा गांवचे पाणी - भाग चौथा २००५ - २००६ मधील मासिक बहर मधे " बारा गांवचे पाणी " ही मालिका प्रकाशित झाली होती . ती आता नव्या रूपात दर महिन्याला पुनःप्रकाशित होत आहे . आपले अभिप्राय कळवावे . -       नरेन्द्र कुलकर्णी बारा गांवचे पाणी - गांव चौथे – अहमदनगर अनेक गावांचा स्थ‍ापना दिवस म्हणजेच ते गाव कुठल्या दिवशी जन्माला आलं ते माहित नसतं, पण अहमदनगरचे असं नाही. २८ मे १४९० या दिवशी अहमदनगर गावाचा जन्म झाला. अहमदनगर - एकही कान, मात्र, उकार व वेलांटी नसलेल्या नावाचे गांव. सर्वजण पण रूढार्थाने 'नगर च म्हणतात. पुण्याहून औरंगाबाद, जळगाव व नागपूरला जाणाऱ्या प्रत्येक गाडीला अहमदनगर वाटेत लागतेच. पुण्याहून अक्षरश: २। तासात नगरला पोहोचतो. आता तर रस्ताही खूप छान झाला आहे. नगर गाव मुळातच उंच ठिकाणी आहे. कोणत्याही दिशेने पोहोचताना घाट चढूनच जावे लागते. अहमदनगरला फार मोठा इतिहास आहे. मूळ पाथ्री, परभणीच्या कुलकर्णी घराण्यातील तिमापा, चरितार्थ शोधण्याच्या निमित्ताने विजयनगर कडे निघा...