Posts

Image
  बारा गांवचे पाणी - गांव सातवे - कराड मुंबई बेंगलोर हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा हायवे. सातारा ते कोल्हापूर यांमधे रिकामे पठार लागते. त्या पठारावर कऱ्हाड उर्फ कराड गांव लागतेच. आणि कोकणातून जर कुंभार्ली घाटातून पाटणकडे याल तर हळूहळू सह्याद्रीची कडेकपारी संपून सपाट प्रदेश लागतो. आजूबाजूचे सगळे डोंगर अचानक नाहीसे होतात. काळ्या मातीत डोलणारी हिरवीगार रसरशीत शेते दिसू लागतात आणि मग समजायचे की कराड आले. खरं तर रोडपेक्षा रेल्वेने जर साताऱ्याहून किंवा सांगलीहून कराडला आलात तर निसर्गाची खरी कमाल पहाता पहाता कराड कधी येते ते कळतच नाही. कराडच्या पंचक्रोशीत फक्त दोनच डोंगर दिसतात. एक सदाशिवगड आणि दुसरा आगाशिवा.   कृष्णा आणि कोयना या दोन नद्या महाबळेश्वरला उगम पावतात. सुमारे १३० किमी चा वेगवेगळा प्रवास करतात आणि कराडला एकमेकींना भेटतात. ही भेट इतकी वेगळी की अगदी जणू दोन बहिणी समोरासमोरून येऊन घट्ट मिठी मारतात. आणि मग एकत्र झालेले पाणी ९० अंशात वळून पुढे वाहू लागते. त्यामुळे इंग्लिश T आकार तयार होतो. पूर्ण पृथ्वीवर दोन नद्यांचा असा हा एकमेव संगम. त्यामुळे त्याला प्राप्त झाल...
Image
केल्याने देशाटन   - माद्रिद स्पेन हा युरोप मधला महत्त्वाचा देश . स्पेन म्हणले की आपल्याला फक्त बार्सिलोना डोळ्यासमोर येते . पण ही राजधानी नाही . त्याची राजधानी - माद्रिद . कंपनीच्या कामानिमित्ताने माद्रिद ला गेल्या वर्षी काही काळ घालवावा लागला . सुमारे ३३ लाख लोकवस्ती . लोकसंख्येप्रमाणे स्पेन मधील सर्वाधिक व लंडन आणि बर्लिनच्या खालोखाल युरोप मधील तिसऱ्या क्रमांकाचे हे शहर . सहसा आपण युरोपची टूर काढली की स्पेनला यायचा विचार करत नाही . किंबहुना युरोपचे बाकी सगळे देश बघून झाले की मग इकडे यायचा विचार करतो . काही गोष्टी जरी सारख्या असल्या तरी अनेक गोष्टी भिन्न असल्याने इथे प्रत्येकाने जरूर येऊन जावे . स्पेन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे Bull Fighting , फ्लॅमिंको नाच , वेगवेगळ्या सणांमध्ये तल्लीन झालेले लोक , कानाला गोड भासणारी स्पॅनिश भाषा आणि सुंदर बीचेस . अर्थात माद्रिदला बीच नाही . परंतू काही तासांच्या अंतरावर फार सुंदर बीचेस आहेतच . पहिल्या व दुसऱ्य...
  उन्हाळ्याची सुट्टी   २०२२ चा मे महिना आला आणि माझे मन अनेक वर्षे मागे जाऊन डोळ्यासमोर अहमदनगर हे शहर तरळले. माझ्या आईचं माहेर - अहमदनगर म्हणजे नगरच. माझे जन्मगाव. माझ्या शालेय जीवनातील उन्हाळ्याची जवळपास प्रत्येक सुटी नगरमधे गेली. अगदी बालवाडीपासून अकरावी पर्यंत .   माझ्या आईचे आजोबा साधारण एकोणशे दोन साली अहमदनगरमधे नोकरी करायला पोहोचले आणि तिथे स्थायिक झाले . माझे पणजोबा चांगले ड्रॉइंग मास्तर म्हणून खूप प्रसिद्ध होते . माझ्या बाबांच्या बदलीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावांमधे राहिलो. कल्याण, कराड, रत्नागिरी, सांगली वगैरे . शालेय शिक्षण या गावांमधे झाले . एक गोष्ट मात्र नक्की ठरलेली, मे महिन्याच्या सुटीमधे आजोळी नगरला जायचंच .   मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकदा का वार्षिक परीक्षा संपली की मग नगरला जायचे वेध लागायचे . मग बाबा जाऊन एसटीचे रिझर्व्हेशन करून यायचे . या चारही गावातून नगरला डायरेक्ट जाणारी कुठलीच एसटी नव्हती . त्यामुळे शक्यतो पुण्याला थांबून एसटी बदलून म...