केल्याने देशाटन  - माद्रिद

स्पेन हा युरोप मधला महत्त्वाचा देश. स्पेन म्हणले की आपल्याला फक्त बार्सिलोना डोळ्यासमोर येते. पण ही राजधानी नाही. त्याची राजधानी - माद्रिद. कंपनीच्या कामानिमित्ताने माद्रिद ला गेल्या वर्षी काही काळ घालवावा लागला. सुमारे ३३ लाख लोकवस्ती. लोकसंख्येप्रमाणे स्पेन मधील सर्वाधिक लंडन आणि बर्लिनच्या खालोखाल युरोप मधील तिसऱ्या क्रमांकाचे हे शहर. सहसा आपण युरोपची टूर काढली की स्पेनला यायचा विचार करत नाही. किंबहुना युरोपचे बाकी सगळे देश बघून झाले की मग इकडे यायचा विचार करतो. काही गोष्टी जरी सारख्या असल्या तरी अनेक गोष्टी भिन्न असल्याने इथे प्रत्येकाने जरूर येऊन जावे.

स्पेन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे Bull Fighting, फ्लॅमिंको नाच, वेगवेगळ्या सणांमध्ये तल्लीन झालेले लोक, कानाला गोड भासणारी स्पॅनिश भाषा आणि सुंदर बीचेस. अर्थात माद्रिदला बीच नाही. परंतू काही तासांच्या अंतरावर फार सुंदर बीचेस आहेतच. पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये फार कमी हानी झाली. त्यामुळे जुन्या इमारती राजवाडे आजही अबाधित आहेत. आणि मुख गोष्ट म्हणजे सरकारने ते जतन करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

स्पेनच्या बरोबर मध्ध्यावर माद्रिद वसले आहे. ईशान्य दिशेला फ्रान्सशी जोडले आहे आणि पश्चिमेला पोर्तुगालशी. जर विमानप्रवास टाळायचा असेल तर कारने किंवा ट्रेनने अगदी आरामात माद्रिदला पोहोचता येते. सुमारे वर्षभर सतत काही ना काही तरी उत्सव सुरु असलेल्या या शहरात हॉटेल मिळणे कोणत्याही दिवशी कठीण जाते. त्यामुळे आधी बुकिंग करूनच जावे. मध्यवर्ती भागात हॉटेल घेतलेले सोयीचे. मला गेल्यागेल्या Gran Via नावाच्या रस्त्यावर राहायला मिळाले. अतिशय सुंदर ठिकाण.

पूर्ण स्पेन वर तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्य पसरले ते अगदी आठव्या शतकापर्यंत. मग मोरक्कन राजांनी संपूर्ण स्पेन चा ताबा घेतला. .. ७५६ मध्ये कॉर्डोबा या ठिकाणी पहिली सत्ता स्थापन केली आणि वाढवत नेली. पूर्ण स्पेनभर त्यांनी वेगवेगळ्या जागी आपली छाप उमटवली. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी किल्ले (काही भुईकोटबांधले, त्या सर्वांना अल कासर (अरबी शब्द) म्हणतात. .. ८५२ मध्ये माद्रिद मध्ये अल कासर बांधला राजधानी बनवली. प्रथम मायरीट, मग माग्रीट शेवटी माद्रिद असे नामांकरण या गावाचे होत गेले.

.. १०८५ च्या सुमारास मूळ ख्रिश्चन रहिवास्यांनी स्वातंत्र्यलढा सुरु केला उठावात मोरोक्कन अरबी लोकांना नेस्तनाबूत केले. एवढेच काय, जागोजागी बांधलेल्या मशिदी बंद करून तिथे चर्च स्थापन केले. त्यामळे स्पेन मध्ये फिरताना जागोजागी मशिदीसारख्या घुमटाचे चर्च पाहायला मिळतात. हळूहळू लोकवस्ती वाढू लागली आणि गाव मोठे होऊ लागले. साधारण .. १०७० मध्ये जन्मलेल्या सॅन इसिड्रो नावाच्या एका शेतकरी संतांची गमतीशीर आख्यायिका सांगितली जाते ती आपल्या संत गोरा कुंभारशी पूर्ण जुळते. दरवर्षी ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात San Isidro फेस्टिवल साजरा केला जातो. मला तो पाहायला मिळाला. या फेस्टिवलमध्ये जुने कपडे घालून परेड, नाच, काही संगीतिका आणि खाऊ पिऊची चंगळ अशी धम्माल असते.

.. १५६१ मध्ये त्या वेळचा राजा फेलीप दुसरा याने माद्रिद ही पूर्ण स्पेनची राजधानी म्हणून घोषित केले आणि आजही तीच राजधानी मानली जाते. हळूहळू कलाकार आणि कारागिरांनी गाव गजबजू लागले गावाची प्रतिष्ठा वाटत गेली. सोळाव्या शतकापासून बांधून तयार होत गेलेल्या असंख्य इमारती आजही शानदार उभ्या आहेत. गावात फेरफटका मारताना अगदी चुकवता येण्यासारख्या.

इतर युरोपमध्ये जसे Summer मधे वातावरण असते, तसेच माद्रिदमधे पण दिसते. उदा. पादचारी मार्गावर टेबले खुर्च्या टाकून मस्त रेस्टॉरंटमधे बसून राहणे, स्वच्छता, मेट्रो बसने येणारी जाणारी जनता, असंख्य बार, वगैरे अनेक गोष्टी. पण वेगळेपण हे की माद्रिदमधे, किंबहुना पूर्ण स्पेनमधे रात्री उशिरापर्यंत सुरु असलेली दुकाने, रेस्टॉरंट्स. इतर युरोपमधे सहसा संध्याकाळी लवकर डिनर घेतले जाते आणि लंच अगदी थोडे असते. पण स्पेनमधे लंच अगदी - तास होते, दुपारी तीन वाजेपर्यंत आणि डिनर रात्री १० नंतर सुरु होते सर्व जण पहाटे , पर्यंत जागे असतात.

२०० ते ३०० वर्षापूर्वीचे दगडी रस्ते. चौकाचौकात सजवलेली कारंजी, आणि दुतर्फा भव्य आणि सुंदर इमारती यांनी माद्रिद नटलेले आहेच. पण प्रत्येक चौकाचा वेगळा बाज आणि इतिहास आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी गावाचा कायापालट झाला आणि खूप खूप मोठे रस्ते बांधले गेले. सायकलींसाठी, बस टॅक्सी साठी वेगळा मार्ग. आणि सर्व भागांना भुयारी रेल्वेने जोडलेले शहर. गेल्या वर्षी (२०१९) मधे मेट्रोला १०० वर्षे पूर्ण झाली. मेट्रो किंवा पायी फिरून पूर्ण गाव अगदी छान पाहता येते.

माद्रिद मधली काही महत्त्वाची स्थळे :-

१.      रॉयल पॅलेस

.. १०८५ पासून राजघराण्याचा हा अतिशय सुंदर राजवाडा. Manzanares नावाच्या नदीकाठी बांधला. १५६१ मधे प्रथम खूप मोठ्या प्रमाणात विस्ताराला. १७३४ मधे आगीमध्ये भस्मसात झाला पुन्हा बांधला गेला. हा राजवाडा व्यवस्थित बघायला किमान तास ठेवा. Audio Guide मात्र अत्यावश्यक किंवा Guided tour घ्या. सुमारे १३५,००० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ ३४१८ खोल्या असलेला हा राजवाडा कार्पेट एरियाप्रमाणे युरोप मधे सर्वात मोठा आहे.

 

आत शिरताना १६३७ च्या एका घड्याळापासून टूरची सुरुवात होते. एकापाठोपाठ एक अशा अचंबित करणाऱ्या गोष्टी घटना डोळ्यासमोर उभ्या करत आपण पुढे सरकत राहतो. इतर राजवाड्याप्रमाणे इथेही अतिसुंदर सजवलेल्या राजा राणीच्या मुलांच्या खोल्या आहेतच. या शिवाय सिहासन, एका वेळी १६० जण जेवण करू शकतील असे Dining table, छोटेसे चर्च, रंगेबिरंगी झुंबरे, कार्पेट्स, आणि युद्ध शस्त्रागार. या अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो.

 

२.      प्राडो म्युझियम

बाराव्या शतकापासून १९ व्व्या शतकापर्यंत असंख्य पेंटिंगचे हे भव्य म्युझियम. सुमारे ७२०० पेंटिंग्स इथे बघायला मिळतात. स्पॅनिश चित्रकारांचे हे सर्वात मोठे एकत्रित collection. Velanzquez  गोया हे त्यामधे  अग्रेसर. १००० हून अधिक अद्भुत पुतळेसुद्धा पाहायला मिळतात. जास्त करून येशू ख्रिस्ताशी संलग्न आहेत. याशिवाय इटालियन, डच आणि फ्रेंच कलाकारांचे पण आविष्कार बघायला मिळतात.

 

३.      रेटीरो पार्क

 

१६ व्या  शतकात गावाच्या मध्यभागी बांधली गेलेली हि अति भव्य बाग. सुमारे ३५० एकर वर पसरलेली. मध्ये सुंदर तलाव. जागोजागी वेगवेगळ्या राजांचे भव्य पुतळे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, आणि क्रिस्टल पॅलेस या भेट देण्यासारख्या गोष्टी.

 

 

 

 

 

 

४.     प्लाझा मेयर

एक आयताकृती आकारात बांधली गेलेली जागा. तिच्या सर्व बाजूनी ते मजली एकसलग बांधली गेलेली सुंदर इमारत. .. १६१७ मध्ये बांधलेली. मध्यभागी फेलीप चा सुंदर पुतळा. रोज संध्याकाळी हा भाग नवचैतन्याने भरून जातो. भरभरून गर्दी होते. वेगवेगळे कलाकार आपापलय कला सादर करत राहतात.

 

५.     Puerta de Toledo –

इ.स. १८१३ मधे बांधलेले एक अतिशय सुंदर गेट. माद्रिद शहराला एकूण १९ दरवाजे बांधले गेले. त्यातला हे सर्वात शेवटी बांधला गेलेला दरवाजा.

 

६.     टेम्पल दे डेबोड

इजिप्त मध्ये आस्वान या ठिकाणी दुसऱ्या शतकात बांधले गेले हे इसिस नावाचे देवीचे देऊळ. १९६० मधे ज्यावेळी नील नदीवर धरण बांधण्याचे काम सुरु झाले तेव्हा हे देऊळ पाण्याखाली जाणार होते. स्पेन सरकारने ते देऊळ तिथून उचलून माद्रिद मधे आणून वसवले.

 

७.     Sobrino de Botín -

संपूर्ण विश्वातील आजतागायत चालू असेलेले हे रेस्टॉरंट. इ.स. १७२५ पासून अविश्रांत सुरु आहे. आजही इथे आधी बुकिंग करूनच जावे लागते. असे म्हटले जाते कि इ.स. १७२५ मध्ये पेटवलेली आग अजूनही विझवलेली नाही.

 

८.     प्लाझा डी टोरोस

स्पेन म्हटले की bull fighting आपोआप डोळ्यासमोर येते. स्पेन मध्ये खरे तर जागोजागी बैलांशी झुंज घडवली जाते. ही एक परंपरा आहे. माद्रिद मधे ही जागा एका स्टेडियमच्या आकारात बांधली गेली आहे. ५ ते ७००० प्रेक्षक बसून झुंज पाहू शकतात. मी पासून ऑक्टोबर पर्यंत पंढरवाड्यातून एका रविवारी आजही झुंझ होते. जिंकणाऱ्यांचे भरपूर कौतुक होते. मोठा सन्मान मिळतो. इतर दिवशी हे स्टेडियम एक म्युझियम म्हणून पाहायला मिळते.

 

९.      रिअल माद्रिद स्टेडियम

Image result for madrid football stadium"फुटबॉल हा स्पॅनिश लोकांचा अत्यंत आवडता खेळ. अक्षरशः स्वतःचा जीव ओवाळून टाकतात. माद्रिद मधे Real Madrid  ही फुटबॉलला वाहून घेतलेली संस्था आहे. असंख्य नामांकित खेळाडू इथे तयार झाले. या संस्थेचे Santiego Bernebau हे फुटबॉल स्टेडियम. .. १९४७ साली बांधून पूर्ण झाले. इथे सुमारे ८१००० प्रेक्षक सामना एका वेळी बघू शकतात. अनेक युरोपियन लीग बरोबर १९८२ फिफा Worldcup ची final match इथे झाली. मॅच नसेल तेव्हा इथले म्युझियम पाहता येते. संपूर्ण स्टेडियमचा बांधण्यापासूनचा इतिहास, इथे तयार झालेले खेळाडू, त्यांनी जिंकलेले सामने यांची फार सुंदर झलक इथे पहायला मिळते.

 

 

१०.    माद्रिद प्राणिसंग्रहालय

माद्रिद झू ही एक न चुकवण्यासारखी जागा. ५०० च्या वर प्रकारांचे ६००० हून अधिक प्राणी इथे पहायला मिळतात. इथले Dolphenerium खूप पाहण्यासारखे आहे.

यासह अनेक स्थळे माद्रिद मधे पहाण्यासारखी आहेत. फक्त तुम्हाला वेळ किती आहे त्यावर ठरवा . जुन्या माद्रिद गावाबरोबर आता नवे माद्रिद सुद्धा खूप वाढत चालले आहे. नव्या भागामध्ये टोलेजंग इमारती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

माद्रिदच्या आसपास काही ठिकाणे -

Toledo, Segovia, El Escoral  वगैरे अनेक. या जागा तुम्हाला सुमारे १००० ते १२०० वर्षे मागे घेऊन जातात. इतिहास प्रेमींना यापेक्षा अजून मेजवानी कोणतीच नाही.

- नरेंद्र कुलकर्णी

narendra.

Comments

Popular posts from this blog